Monday, May 2, 2011

Asrondi Vrukshwalli

वृक्षवल्ली रोपवाटिका हे कोकणातले एक परिचित नाव. असरोंडी गावातील हि नर्सरी विजय सावंत उर्फ विके यांच्या २० वर्षांच्या अथक मेहनतीतून उभी राहिली आहे. विजय सावंत यांच्या कल्पकतेमुळे या रोपवाटीकेला एखाद्या पर्यटन स्थळाचेच रूप आले आहे. आंबा, फणस, काजू, करवंदा पासून ते विविध प्रकारची फुलझाडे, चंदन अश्या शेकडो देशीविदेशी जातींची रोपटी सावंत यांनी विकसित केली आहेत. स्वत शेतीचे मास्टर डिग्री असल्याने तंत्रशुद्ध पद्धतीने रोपवाटिका विकसित करणे सावंतांना सोपे गेले. जादूचा खजिना उघडावा तसा रोपवाटीकेचा एकेक कोपरा आपल्यासमोर येतो आणि मन हरखून जाते.
For more photos click https://picasaweb.google.com/raj.asrondkar/Nursary#

No comments:

Post a Comment