Thursday, June 27, 2013

Manisha Yadav stood first in Asrondi...


बाप अशिक्षित...कंठात आवाज होता, पण शब्द नव्हते. त्याचे शब्द मोठ्या मुश्किलीने आपल्या पकडीत येतील, इतके पराकोटीचे बोबडे उच्चार...काहीसा गतिमंद...तरी मोलमजुरी करायचा...वय होत गेलं...शेवटी घरच्यांनी एक गरीब मुलगी पाहून तिच्याशी लग्न लावून दिलं..मुली झाल्या. देखण्या ...तितक्याच बुद्धिमान...बाप अनेक वर्ष आजारी...खूप हाल झाले...एक दिवस त्याने जगाचा निरोप घेतला....आता जबाबदारी आईची होती...तिने जिद्दीने मुलींना शिकवलं...एकीने यंदाच बारावी पास केलं, तर दुसरीने दहावी...मनीषा यादव...माझ्या अस्ररोंडी गावची आणि गावच्याच माध्यमिक विद्यामंदिर ची विद्यार्थिनी...९१ टक्के गुण मिळवून शाळेत, गावात पहिली आली....शालांत परीक्षेत असरोंडी गावात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास मी दरवर्षी माझ्या आजोबांच्या स्मरणार्थ पुरस्कार देतो..यंदा शाळेतून फोन आला नि हि बातमी ऐकली, तेंव्हा पटकन डोळे भरून आले....

Thursday, May 19, 2011


असरोंडीची माध्यमिक विद्यामंदिर ( Madhyamik  Vidyamandir , Asrondi  )शाळा हि गावाची शानच म्हटली पाहिजे. मेहनत करणारा शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणारे शाळेचे व्यवस्थापन यामुळे शाळेला एक गौरवास्पद दर्जा प्राप्त आहे.  आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणाऱ्या सुरेश कुराडे यांच्याकडे सध्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आहे. शाळेला एक नवा चेहरामोहरा देण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.

Monday, May 2, 2011

Asrondi Vrukshwalli

वृक्षवल्ली रोपवाटिका हे कोकणातले एक परिचित नाव. असरोंडी गावातील हि नर्सरी विजय सावंत उर्फ विके यांच्या २० वर्षांच्या अथक मेहनतीतून उभी राहिली आहे. विजय सावंत यांच्या कल्पकतेमुळे या रोपवाटीकेला एखाद्या पर्यटन स्थळाचेच रूप आले आहे. आंबा, फणस, काजू, करवंदा पासून ते विविध प्रकारची फुलझाडे, चंदन अश्या शेकडो देशीविदेशी जातींची रोपटी सावंत यांनी विकसित केली आहेत. स्वत शेतीचे मास्टर डिग्री असल्याने तंत्रशुद्ध पद्धतीने रोपवाटिका विकसित करणे सावंतांना सोपे गेले. जादूचा खजिना उघडावा तसा रोपवाटीकेचा एकेक कोपरा आपल्यासमोर येतो आणि मन हरखून जाते.
For more photos click https://picasaweb.google.com/raj.asrondkar/Nursary#

Asrondi Bhekartaka : An hour trip

असरोंडी गांवचा भेकर टाका एक निसर्गरम्य स्थान आहे. तिथून होणारे कणकवलीचे विहंगम दर्शन, दीडशे वर्षे जुना 
दिमाखदार वड, भेकर ताक्याची टेकडी, धनगरवाडी, या
सगळ्यात वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही...
अनुभवासाठी लिंक क्लिक करा :
https://picasaweb.google.com/raj.asrondkar/Bhekartaka#

Friday, February 4, 2011

Faujdar Tukaram Asrondkar Smruti Shaishnik Gungaurav Puraskar









Raj Asrondkar, The Ex corporator & the founder president of social movement Kaydyane Waga, gives educational award to student who stands first in Madhyamik Vidyamandir,Asrondi every year. This is third year of award. Dipak Ghadigaonkar is the award winner.

Wednesday, December 15, 2010

Want to post on this blog?

If u r belonging to Asrondi Village and want to post ur views, information or any other details about Asrondi Village or Asrondkars, then send ur matter with photographs to raj.asrondkar@gmail.com. If u contiue sending matter, which is interested and informative, then u will be authorised to post on this blog directly.

Sunday, December 5, 2010


Asrondi Vidyamandir is celebrating its golden jubily year. Various functions and events are being arranged regarding it. School is planning to publish a SMARNIKA. To discuss the related issues a meeting was called on sunday, 5th of December,2010, 5 pm at Chhabildas Highschool, Dadar (Mumbai). School Chairman Vijay Sawant and Ex corporator Raj Asrondkar, Sharadchandra Bhau Sawant( Adhyaksh, Mumbai Gramasth Mandal), Parashuram Appa Sawant, Anant Daulat Sawant, Ankush Asrondkar, Dilip Tambe, Prakash Viththal Sawant, Suresh Kurhade (Mukhyadhyapak) were present there.



Posted by Picasa

Monday, August 23, 2010

Lingeshwar Temple and Pavanadevi Temple of Asrondi


Our beloved Vijaymastar is no more....

Name: Vijay Arjun Yadav

Born on: 2nd March 1955
Expired on : 18th June 2010

Education : BA
Primary and Secondary Education : Asrondi . Taluka Malvan District Sindhudurg
( 11th STD), First Class in
Hindi-English Special Exams
B.A from Kolhapur University

Occupation: Teacher at Bidwadi – Hurberne (village) -5 years
1980 – P. F Office – Bandra -3 years
1983 – BPCL – Bharat Petroleum Corporation Limited – Mahul

Participation in Social organizations and committees:

1) A member of BPCL – SC/ST Association
2) Chairman/ Secretary of Darshan CHS-Mhada- Dindoshi
3) Secretary – Malvan Taluka Samiti
4) Secretary – Dr. Babasaheb Ambedkar Sanskrutik Kendra - Mumbai

Wednesday, November 4, 2009

My sweet home.

तुकाराम फौजदार

उल्हासनगरचे माजी नगरसेवक व् एनसीपी पक्षाचे नेता राज असरोंडकर हे असरोंडीचे. हे त्यांचेच गावातले घर. राज म्हणजे फेमस तुकाराम फौजदार यांचा नातू. राजच्या आई जयश्री यांनी जिद्द करून हे घर पुन्हा बांधलं. त्यांना पाठबळ दिले सावलाराम यांनी. ते आबाजी, म्हणजे तुकारामांचे मोठे भाऊ, यांचे सुपुत्र. आबजीन्नीच मुळ घर बांधलं होतं. १०० वर्षं जुन्न होतं ते. त्याची पड़झड झाली होती. आज याच घराची त्याच्या देखण्या रूपामुले चर्चा सुरु आहे.

Asrondi-An Introduction

असरोंडी हे एक निसर्गरम्य असं गाव. सिधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील हे गाव चारी बाजूंनी डोंगरमाथ्याने वेढ्लेले आहे. कनकवली हे जवळचे  शहर. हिरवाईने नटलेले गाव लागते, मुंबई गोवा मार्गावर वाग्दे फाटयाला. वाग्देकडून आत शिरलं की आधी सातरल, मग कासरल आणि पुढे असरोंडी. भेकर टेकडी कडून वर आलं की पावनादेवी मंदिराचं दर्शन होतं आणि आपण आपोआप नतमस्तक होतो.  प्रसन्न वातावरण ही असरोंडीची ओळख. असरोंडी मार्गाने पुढे आंगनेवाड़ी व पुढे मालवणला जाता येतं.