असरोंडीची माध्यमिक विद्यामंदिर ( Madhyamik Vidyamandir , Asrondi )शाळा हि गावाची शानच म्हटली पाहिजे. मेहनत करणारा शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणारे शाळेचे व्यवस्थापन यामुळे शाळेला एक गौरवास्पद दर्जा प्राप्त आहे. आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणाऱ्या सुरेश कुराडे यांच्याकडे सध्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आहे. शाळेला एक नवा चेहरामोहरा देण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.
Asrondi is a village in Malvan Tehsil(Dist.Sindhudurga).The people belonging this village are scattered due their jobs or any other reasons. This is an effort to communicate them at one platform.
Thursday, May 19, 2011
Monday, May 2, 2011
Asrondi Vrukshwalli
वृक्षवल्ली रोपवाटिका हे कोकणातले एक परिचित नाव. असरोंडी गावातील हि नर्सरी विजय सावंत उर्फ विके यांच्या २० वर्षांच्या अथक मेहनतीतून उभी राहिली आहे. विजय सावंत यांच्या कल्पकतेमुळे या रोपवाटीकेला एखाद्या पर्यटन स्थळाचेच रूप आले आहे. आंबा, फणस, काजू, करवंदा पासून ते विविध प्रकारची फुलझाडे, चंदन अश्या शेकडो देशीविदेशी जातींची रोपटी सावंत यांनी विकसित केली आहेत. स्वत शेतीचे मास्टर डिग्री असल्याने तंत्रशुद्ध पद्धतीने रोपवाटिका विकसित करणे सावंतांना सोपे गेले. जादूचा खजिना उघडावा तसा रोपवाटीकेचा एकेक कोपरा आपल्यासमोर येतो आणि मन हरखून जाते.
For more photos click https://picasaweb.google.com/raj.asrondkar/Nursary#
For more photos click https://picasaweb.google.com/raj.asrondkar/Nursary#
Asrondi Bhekartaka : An hour trip
असरोंडी गांवचा भेकर टाका एक निसर्गरम्य स्थान आहे. तिथून होणारे कणकवलीचे विहंगम दर्शन, दीडशे वर्षे जुना
दिमाखदार वड, भेकर ताक्याची टेकडी, धनगरवाडी, या
सगळ्यात वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही...
अनुभवासाठी लिंक क्लिक करा :
https://picasaweb.google.com/raj.asrondkar/Bhekartaka#
अनुभवासाठी लिंक क्लिक करा :
https://picasaweb.google.com/raj.asrondkar/Bhekartaka#
Subscribe to:
Posts (Atom)