Wednesday, November 4, 2009

Asrondi-An Introduction

असरोंडी हे एक निसर्गरम्य असं गाव. सिधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील हे गाव चारी बाजूंनी डोंगरमाथ्याने वेढ्लेले आहे. कनकवली हे जवळचे  शहर. हिरवाईने नटलेले गाव लागते, मुंबई गोवा मार्गावर वाग्दे फाटयाला. वाग्देकडून आत शिरलं की आधी सातरल, मग कासरल आणि पुढे असरोंडी. भेकर टेकडी कडून वर आलं की पावनादेवी मंदिराचं दर्शन होतं आणि आपण आपोआप नतमस्तक होतो.  प्रसन्न वातावरण ही असरोंडीची ओळख. असरोंडी मार्गाने पुढे आंगनेवाड़ी व पुढे मालवणला जाता येतं.

1 comment: