
बाप अशिक्षित...कंठात आवाज होता, पण शब्द नव्हते. त्याचे शब्द मोठ्या मुश्किलीने आपल्या पकडीत येतील, इतके पराकोटीचे बोबडे उच्चार...काहीसा गतिमंद...तरी मोलमजुरी करायचा...वय होत गेलं...शेवटी घरच्यांनी एक गरीब मुलगी पाहून तिच्याशी लग्न लावून दिलं..मुली झाल्या. देखण्या ...तितक्याच बुद्धिमान...बाप अनेक वर्ष आजारी...खूप हाल झाले...एक दिवस त्याने जगाचा निरोप घेतला....आता जबाबदारी आईची होती...तिने जिद्दीने मुलींना शिकवलं...एकीने यंदाच बारावी पास केलं, तर दुसरीने दहावी...मनीषा यादव...माझ्या अस्ररोंडी गावची आणि गावच्याच माध्यमिक विद्यामंदिर ची विद्यार्थिनी...९१ टक्के गुण मिळवून शाळेत, गावात पहिली आली....शालांत परीक्षेत असरोंडी गावात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास मी दरवर्षी माझ्या आजोबांच्या स्मरणार्थ पुरस्कार देतो..यंदा शाळेतून फोन आला नि हि बातमी ऐकली, तेंव्हा पटकन डोळे भरून आले....