Wednesday, November 4, 2009

My sweet home.

तुकाराम फौजदार

उल्हासनगरचे माजी नगरसेवक व् एनसीपी पक्षाचे नेता राज असरोंडकर हे असरोंडीचे. हे त्यांचेच गावातले घर. राज म्हणजे फेमस तुकाराम फौजदार यांचा नातू. राजच्या आई जयश्री यांनी जिद्द करून हे घर पुन्हा बांधलं. त्यांना पाठबळ दिले सावलाराम यांनी. ते आबाजी, म्हणजे तुकारामांचे मोठे भाऊ, यांचे सुपुत्र. आबजीन्नीच मुळ घर बांधलं होतं. १०० वर्षं जुन्न होतं ते. त्याची पड़झड झाली होती. आज याच घराची त्याच्या देखण्या रूपामुले चर्चा सुरु आहे.

Asrondi-An Introduction

असरोंडी हे एक निसर्गरम्य असं गाव. सिधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील हे गाव चारी बाजूंनी डोंगरमाथ्याने वेढ्लेले आहे. कनकवली हे जवळचे  शहर. हिरवाईने नटलेले गाव लागते, मुंबई गोवा मार्गावर वाग्दे फाटयाला. वाग्देकडून आत शिरलं की आधी सातरल, मग कासरल आणि पुढे असरोंडी. भेकर टेकडी कडून वर आलं की पावनादेवी मंदिराचं दर्शन होतं आणि आपण आपोआप नतमस्तक होतो.  प्रसन्न वातावरण ही असरोंडीची ओळख. असरोंडी मार्गाने पुढे आंगनेवाड़ी व पुढे मालवणला जाता येतं.